होय, महिन्द्रा ट्रॅक्टर्स ही एक भारतीय कंपनी आहे आणि गेली 37 वर्षे भारताची आघाडीची ट्रॅक्चर निर्माती आणि मार्केटमधील अग्रणी आहे. ती संख्येच्या दृष्टीने सुद्धा उत्तर अमेरिका, मेक्सीको, ब्राझील, टर्की, दक्षिण आफ्फ्रिका आणि जपान सहित 40 देशांमध्ये अस्तित्व असलेली जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माती आहे.
महिन्द्रा ट्रॅक्टर्सचा आरंभ दि इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनी ऑफ इंडिया (आयटीसीएल), महिन्द्रा अँड महिन्द्राची इंटरनॅशनल हार्वेस्टर कंपनी आणि व्होल्टास लि. बरोबर संयुक्त कंपनी म्हणून 1963 मध्ये झाला. 1977 मध्ये आयटीसीएल, महिन्द्रा अँड महिन्द्रा मध्ये विलीन झाली आणि अशा प्रकारे ट्रॅक्टर डिव्हीजन सुरू झाली.
महिन्द्रा ट्रॅक्टर्स ही महिन्द्रा समूहाची ध्वजनौका असलेल्या महिन्द्रा अँड महिन्द्राची ट्रॅक्टर डिव्हीजन आहे. जे. सी. महिन्द्रा आणि के. सी. महिन्द्रा हे दोघे बंधू, गुलाम मोहम्मद यांच्या बरोबरीने महिन्द्रा समूहाचे संस्थापक होते.
महिन्द्रा ट्रॅक्टर्स ही एक पारितोषिक-विजेती ट्रॅक्टर निर्माती आहे. आम्ही टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूम) साठी जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या डेमिंग पारितोषिकाचे प्राप्तकर्ते आहोत. जपान क्वालिटी मेटल जिंकणारे आम्ही जगातील पहिले ट्रॅक्टर निर्माते सुद्धा आहोत.
आमच्या कडून ट्रॅक्टर करता तेव्हा, आम्ही उत्तम किंमतीला सर्वोत्तम दर्जाची हमी देतो. आम्ही कठोरात कठोर दर्जा तपासणी आणि नियंत्रण हाती घेतो. आम्ही वेगवेगळ्या ब्रँडखाली ट्रॅक्टर्सची विस्तृत श्रेणी देऊ करतो जे केवळ इंधन कार्यक्षम नाहीत तर उत्पादकता वाञवण्यासाठी आवश्यक असलेल्या अद्यतन तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. बदली सुटे भाग त्वरेने उपलब्ध आहेत आणि आम्ही विशाल सेवा नेटवर्क देऊ करतो. या सर्वांची आम्हाला सर्वात विश्वासार्ह, जगात सर्वात जास्त ट्रॅक्टर विकणारे म्हणून उदयाला येण्यात मदत झाली आहे.,
महिन्द्रा ट्रॅक्टर्सचे मुख्यालय मुंबईत आहे. आमचा पत्ता आहेः
महिन्द्रा अँड महिन्द्रा लि.
फार्म इक्विपमेंट सेक्टर,
फार्म डिव्हीजन,
1 ला मजला, महिन्द्रा टॉवर्स,
आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व),
मुंबई - 400101.
तुम्ही आमच्या career portal (करीअर पोर्टल) ला भेट देऊ शकता आणि रिक्तपदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही तुंमचे ठिकाण आणि नोकरीच्या प्रकाराची पसंती पुरवून उपलब्ध असलेली नोकरी शोधू शकता. जेव्हा सोयीस्कर नोकरीची संधि उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला सूचित करण्यासाठी तुम्ही एक एलर्ट सुद्धा निर्माण करू शकता.
महिन्द्रा ट्रॅक्टर्सची निर्मिती भारतात रुद्रपूर, जयपूर, नागपूर, झहीराबाद आणि राजकोटमध्ये केली जाते. आमचे चीन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा निर्मिती प्लँट आहेत.
37 वर्षे आम्ही शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्यांच्या समोरची अव्हाने समजून घेण्यासाठी त्यांच्या बरोबर अत्यंत जवळीकीने काम केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विविध गरजा, आणि सर्व वेगवेळ्या प्रकारच्या मातीसाठी सोयीस्कर असलेली ट्रॅक्टर्सची विस्तृत श्रेणी देऊ करतो. आमचे ट्रॅक्टर्स एका परवडणाऱ्या किंमतीला पॉवर, दर्जा आणि विश्वासार्हता देऊ करतात. आमच्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत महिन्द्रा एसपी प्लस, महिन्द्रा एक्सपी प्लस, महिन्द्रा जीवो, महिन्द्रा युवो आणि महिन्द्रा अर्जुन नोव्हो. महिन्द्रा ट्रॅक्टर्स खरेदी केल्याने, त्याची शक्तीशाली इंजिने, प्रभावी माइलेज,एसी केबीन, आणि 11.2 केडब्ल्यू (15एचपी) आणि 55.2 केडब्ल्यू (74 एचपी) यांच्या दरम्यानची अश्वशक्ती यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय कार्यक्षमतेने करता येतो.
महिन्द्रा मिनी ट्रॅक्टर्स प्रायतः उद्याने आणि फळबागांमध्ये बागायती शेतीसाठी वापरले जातात. ते सुटसुटीत आकारांत येतात, त्यामुळे ते कपाशी, द्राक्षे, लेंटील्स, डाळिंब, ऊस, भूईमूग आणि इतर सारख्या विविध पीकांसाठी आदर्श ठरतात. तुम्ही त्यांच्या सदुपयोग जमिनीच्या विघटनासाठी आणि ऑपरेशन-पश्चात कामांसाठी सुद्धा करू शकता. आमचे काही सर्वात जास्त विकले जाणारे सुटसुटीत मिनी ट्रॅक्टर्स आहेत महिन्द्रा युवराज 215 एनएक्सटी आणि महिन्द्रा जीवो श्रेणी .
जवळजवळ चार दशकांसाठी, आम्ही भारतातील महिन्द्रा ट्रॅक्टर्स डीलर बरोबर समन्वय राखला आहे आणि वाढलो आहोत. तुम्ही आमच्या Dealership portal (डीलरशिप पोर्टल) ला भेट देऊ शकता, ट्रॅक्टर शोरुम डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे ठिकाण पुरवा आणि अर्जाचा नमुना भरा.
महिन्द्रा ट्रॅक्टर्स शेती उद्योगाच्या सतत बदलणाऱ्या गरजा लक्षात घेऊन, विविध प्रकारची मॉडेल्स देऊ करते.
एसपी प्लसः महिन्द्रा एसपी प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधनाचा वापर करणारे अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्यांचे शक्तीशाली इएलएस इंजिन, उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे, ते शेतीच्या सर्व औजारांबरोबर अतुल्य कामगिरी देतात, मॉडेल्समध्ये समाविष्ट आहेतः
एक्सपी प्लसः महिन्द्रा एक्सपी प्लस ट्रॅक्टर्सच्या श्रेणींमध्ये उच्च कमाल टॉर्क आहे जो सर्व औजारांबरोबर चांगले काम करतो, आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क आहे जो अतुल्य पॉव्र आणि कामगिरीची खात्री करतोः मॉडेल्समध्ये समाविष्ट आहेतः.
संपूर्ण देशात आमचे 1400 टच पॉइंटस् आहेत. तुमच्या जवळची महिन्द्रा ट्रॅक्टर्स शोरुम आणि भारतातील ट्रॅक्टर डीलर्स शोधण्य़ासठी इथे क्लिक करा आणि तुमचे ठिकाण टाका.
महिन्द्रा ट्रॅक्टर्सचा टोल फ्री क्रमांक आहे 18004256576 जो दिवसाचे 24 तास संभाषणासाठी खुला असतो. तुम्हा कोणत्याही साहाय्यासाठी आमच्यापर्यंत [email protected] येथेही पोचू शकता.
महिंद्रा ट्रैक्टर्स
15 से 74 एचपी तक के कई मॉडल बनाती है। 20 एचपी तक के महिंद्रा ट्रैक्टर की तलाश में, आप महिंद्रा युवराज 215 एनएक्सटी का विकल्प चुन सकते हैं। अधिक शक्तिशाली ट्रैक्टर के लिए, महिंद्रा अर्जुन अल्ट्रा - 1 605 डीआई या महिंद्रा नोवो 755 डीआई खरीदने पर विचार करें। आपकी खेती की जरूरतों के अनुरूप हमारे पास विभिन्न प्रकार के ट्रैक्टर रेंज हैं।
हां, महिंद्रा ट्रैक्टर्स पावर स्टीयरिंग विकल्प ट्रैक्टरों को चलाना आसान बनाता है। नीचे पावर स्टीयरिंग विकल्प के साथ महिंद्रा ट्रैक्टर्स की सूची दी गई है।