महिन्द्रा समृद्धि एग्री अवार्ड्स

Mahindra Samriddhi India Agri Awards trophy

महिन्द्रा समृद्धि इंडिया एग्री पारितोषिके अशा हिरोंचा गौरव करते ज्यांनी भारतीय कृषी क्षेत्राला काही हेतूपूर्ण योगदान दिले आहे. महिन्द्रा समृद्धि इंडिया पारितोषिक २०१५ प्रदान समारंभ२४ फेब्रुवारी २०१५ ला नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

उत्पत्ति

महिन्द्रा अँड महिन्द्रा, महिन्द्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर मार्फत भारतीय कृषी अवकाशात आघाडीवर राहिली आहे. महिन्द्राचे फार्म इक्विपमेंट सेक्टर वाढीव उत्पादकता आणि वाढलेली ग्रामीण समृद्धी यात परिणत होणाऱ्या कल्पक शेतीच्या तंत्रज्ञानामार्फत फार्म टेक समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय ठेवते. ते ती त्याच्या महिन्द्रा समृद्धी सेंटर्समार्फत करते.

ही केंद्रे शेतकऱ्यांना माहिती, कल्पक शेती तंत्रज्ञाने आणि व्यापारी उपाय देणारी वन-स्टॉप फार्मर इंटरफेस आहेत. महिन्द्रा समृद्धी भारतीय शेतांतील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे कारण महिन्दामध्ये आम्ही असे मानतो कि जागतिक सामाजिक-आर्थिक विकासाच्या नकाशावर राष्ट्राची वृद्धी वाढविण्यासाठी समृद्ध शेती ही किल्ली आहे. द्दी महिन्द्रा समृद्धीच्या विद्यमाने २०११ मध्ये महिन्द्रा समृद्धी इंडिया ऍग्री पारितोषिके (एमएसआयएए) सुरू करण्यात आली. तेव्हापासून एमएसआयएएच्या तीन (२०११ ते २०१३) यशस्वी आवृत्त्या झाल्या आहेत.

हा पारितोषिके म्हणजे एऱाद्या व्यक्तीने आणि संस्थांनी शेतीच्या क्षेत्रात दिलेल्या हेतूपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. विशाल समाजाच्या फायद्यासाठी शेतीतील उत्तम पद्धतींची देवाण घेवाण करण्याचे हे एक व्यासपीठ आहे. ही पारितोषिके ज्या व्यक्तीं आणि संस्था कोणतीही मर्यादा मानता, कल्पकतेने विचार करून, आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदलांना चालना देऊन सामान्यपणाच्या वर उठल्या आहेत त्यांचा गौरव करतात. पारितोषिके राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरावरील, विविध प्रवर्गातील उत्तम पद्धतींची पोच देतात, जी एक प्रकारे भारतीय कृषी क्षेत्रातील हिरोज् ना मानवंदना आहे.

पारितोषिकांचा चषक कृषी क्षेत्रातील बदलांच्या नेतृत्वाचे लक्षणीय यश प्रतिबिंबीत करतो. सोनेरी गव्हाचा देठ भारतीय शेतातील सोन्याच्या पीकाचे प्रतिनिधीत्व करतो आणि तुकतुकीत, आंतरराष्ट्रीय स्टायलिंग भारतीय कृषी समाजाच्या महत्त्वाकांक्षा आणि यशाशी तंतोतंत जुळते.