सो दि फ्युचर

एपिसोड 3

हार्टिकल्चर

सोदिफ्युचरचा तिसरा प्रसंग (एपिसोड) फलोत्पादनावर प्रकाश टाकतो कारण तो एकूण कृषी उत्पादनाचा बराच मोठा भाग आहे आणि ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करते. या प्रसंगात फलोत्पादनाच्या शात्स्त्राचा विषय येतो तेव्हा समोर यणाऱ्या अनेक नावांपैकी एक असलेले डॉ. राजेंद्र देशमुख सहभागी आहेत. त्यांच्या ३५ वर्षांच्या अनुभवात इस्रायलमधील शिक्षण, एक पेटन्टेड तंत्रज्ञान, ५००+ एकरांची बागायती लागवड आणि अनेक राष्ट्रीय पारितोषिके यांचा समावेश आहे. या प्रसंगात (एपिसोडमध्ये), डॉ. देशमुख शेतचकऱ्यांने फलोत्पादन कसे सुरू करावेपासून ते भारतासाठी सर्वात सोयीस्कर असलेली फलोत्पादन पीके पर्यंत अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकतात.

एपिसोड 2

वाटरशेड मैनेजमेंट

सोदिफ्युचरचा दुसरा प्रसंग (एपिसोड) अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित शेतीतील पाणलोट व्यवस्थापन या विषयाला स्पर्श करतो. या प्रसंगात, पाणी, पर्जन्य जल आणि घम कचरा व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले डॉ. अजित गोखले सहभागी आहेत. डॉ. गोखले यांनी वेगवेगळ्या विभागातीलग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि जल संवर्धनासाठी कल्पक उपाय योजले आहेत.

या प्रसंगात (एपिसोडमध्ये), डॉ. गोखले पाणलोट व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट करतात आणि शाश्वत शेतीसाठी जल संवर्धनाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी योजू शकतील अशा साध्या आणि वास्तव उपायांवर प्रकाश टाकतात.

स्टोरीज् 1

ऑर्गेनिक फार्मिंग

या मलिकेतील पहिली कथा श्री. सुनील साळवींच्या गोष्टीमार्फत भारतीय संदर्भात ऑर्गेनिक फार्मिंगची गरज आणि महत्त्व यावार प्रकाश टाकण्याचे उद्दिष्ट ठेवते. श्री.साळवी हे कॉर्पोरेट व्यवसायाकडून वळून यशस्वीरित्या ऑर्गेनिक शेतकरी झालेले आहेत जे त्यांच्या शेतीच्या पद्धती आणि भारताला#शाश्वततेच्या भविष्याची पेरणी करण्यात मदत करून फरक करत आहेत.

या मालिकेत श्री. साळवी त्यांच्या ऑर्गेनिक शेतीच्या प्रवासाचा मागोवा घेतात आणि ऑर्गेनिक शेतीची प्रक्रिया आणि तिचे शेतकऱ्यांना फायदे आणि जैवविविधता यावर एक अंतर्दृष्टी देतात आणि संपूर्ण शेतकरी समुदायाला शाश्वत भविष्याच्या बियाण्यांची पेरणी करण्यात सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रांकडील पाठबळ मदत करू शकेल असे व्यक्त करून निरोप घेतात.

व्हिडिओ गॅलरी

फोटो गॅलरी