जायरोवेटर(वाटोळे फिरणारे) ZLX| शेतीची अवजारे | ट्रॅक्टरच्या जोडण्या | महिंद्रा ट्रॅक्टर्स

गायरोवेटर झेडएलएक्स

महिन्द्रा झेडएलएक्स गायरोवेटर हे ट्रॅक्टरवर बसवलेले आणि पीटीओ प्रचालित औजार आहे जे एकावेळी 3 कामे म्हणजेच कापणी, मातीचे मिश्रण आणि पातळी समान करणे, करते. महिन्द्रा झेडएलएक्स गायरोवेटर मल्टी स्पीड ड्राइव्हसह सुसज्ज आहे आणि तो विशाल श्रेणीतील रोटर आणि रेशिओज् देऊ करतो.

 
   
 
 
 
टीपः चित्र केवळ प्रतिनिधीक हेतूसाठी आहे.

वैशिष्ट्ये

 • जायरोवेटरने समान पातळीत आणलेला पृष्ठभाग अधिक चांगली इंधन कार्यक्षमता सक्षम करतो.
 • विविध ऍप्लीकेशन्ससाठी मल्टीस्पीड ऍडजस्टर.

 • त्यात मल्टी डेप्थ ऍडजस्टमेंट, ड्युओ कोन मेकॅनिकल वॉटर टाइट सील अशी वैशिष्ट्य़े आहेत जी कोरड्या आणि ओल्या जमिनीतील ऍप्लीकेशनसाठी सर्वात सोयीस्कर आहेत.
 • उत्कृष्ट कापणी आणि खुंट मिसळण्याची आणि खतांच्या चांगल्या मिसळण्याची खात्री करतो. मातीच्या ढेकळांचा अगदी बारीक चूर्ण करतो म्हणजेच चांगल्या नांगरणीसाठी.

 • ZLX जायरोवेटरमध्ये अधिक चांगल्या कापणीसाठी ब्लेडच्या सोयीस्कर प्रकारासह (सी, एल, जे) हेलीकोइडल अँटी वेअर ब्लेडस् आहेत.
 • मातीच्या चांगल्या घुसळण्यामुळे पडलिंगसाठी परिणामकारक आणि पडलर/डिस्क हॅरोच्या तुलनेत कमी स्लिपेज.

 • आवाजरहित सुलभ कामासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीने डिझाइन केलेली श्रेणी.
 • तांदूळ/भाताच्या कापणीनंतर, तो बुरशी वाढवण्यासाठी पीकाच्या अवशेषांचे चूर्ण करतो.

 • महिन्द्रा ZLX जायरोवेटर मल्टीस्पीड ड्राइव्हने सज्ज आहे आणि तो रोटर स्पीड रेशिओज् च्या विस्तृत श्रेणी देऊ करतो. आवश्यक असलेल्या नांगरणीचा दर्जा आणि उपलब्ध असलेली मातीची स्थिती यानुसार रोटरचा वेग बदलता येतो.

वैशिष्ट्य

 महिन्द्रा ZLX 125महिन्द्रा ZLX 145महिन्द्रा ZLX 165महिन्द्रा ZLX 185महिन्द्रा ZLX 205
काम करण्याची रुंदी(m) मध्ये1.251.451.651.852.05
आवश्यक ट्रॅक्टर HP 22.4-44.7kW(30-60 HP)26.1-44.7kW(35-60 HP)29.8-44.7kW(40-60 HP)33.6-44.7kW(45-60 HP)41.0-44.7kW(55-60 HP)
ट्रॅक्टर पीटीओ m)540540540540540
ब्लेडस् ची संख्या3642485460
ब्लेडचा प्रकारLLLLL
ट्रान्समिशनगिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह गिअर ड्राइव्ह
गिअर बॉक्समल्टी स्पीडः 4 स्पीड स्टँडर्ड मल्टी स्पीडः 4 स्पीड स्टँडर्ड मल्टी स्पीडः 4 स्पीड स्टँडर्ड मल्टी स्पीडः 4 स्पीड स्टँडर्ड मल्टी स्पीडः 4 स्पीड स्टँडर्ड

महिंद्र ट्रॅक्टरसह फायदे

 • महिन्द्रा ट्रॅक्टर्स अधिक चांगली ओढण्यची शक्ती आणि जायरोवेटरशी जुळण्यासाठी अचूक वेग देऊ करतात.
 • इंधनाची कमी खपत.

 • कोरड्या आणि ओल्या कामांत मातीचा उत्तम भुगा.