महिन्द्रा 245 Di Orchard

महिन्द्रा 245 DI ORCHARD हा एक इंटर कल्चर आणि बागायती कामांसाठी तयार करण्यात आलेला सुटसुटीत ट्रॅक्टर आहे. हाय पॉवर आणि बॅक अप टॉर्कमुळे, तो केवळ ORCHARD प्रवर्गातील "सगळ्यात जोरदार सगळयात दमदार" ट्रॅक्टरच नाही तर शेती आणि हॉलेजच्या कामांसाठी सर्वोत्तम सुद्धा आहे. मागचा अरुंद ट्रॅक आणि वळण्याची कमी त्रिज्या 245 DI ORCHARD ला दोन पीकांच्या ओळींच्या मध्ये तसेच फळबागांमध्ये अनेक प्रकारच्या इंटर कल्चर कामांसाठी आदर्श ट्रॅक्टर बनवतात.
महिन्द्रा 245 DI ORCHARD हा भविष्याचा विचार करून तयार केलेला आणि डाउन ड्राफ्ट सायलेंसर, पॉवर स्टिअरिंग, ऑइल इमर्सड् ब्रेक्स आणि कामाचा विचार करून आरामासाठी ड्रायव्हरची जागा यासारख्या खास इंटर कल्चर वैशिष्ट्य़ांनी सजवलेला आहे. ते त्याला सोयाबीन, कपाशी, मका, ऊस यासारख्या पीकांसाठी आणि द्राक्षे, डाळिंबे, आंबा संत्री आणि इतर अनेक फळबगांसाठी आदर्श बनविते. याचा उपयोग शेतकरी फवारणी, रोटाव्हेशन, लागवड, पेरणी, झोडणी तसेच हॉलेज काम अशा अनेक उपयोजनांसाठी करतात.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 
Mahindra 245 Di Orchard

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

24 अश्वशक्ती शक्तिशाली पाणी 2 सिलेंडर इंजिन थंड

पॉवर स्टेअरिंग

तेल विसर्जन ब्रेक्स

आडव्या सिलेन्सिर

कमी त्रिज्या अडचणीत

तरतरीत दिसते

अरुंद ट्रॅक रूंदी

वैशिष्ट्य

इंजिन
HP 17.9 kW (24 HP)
प्रकार 4 स्ट्रोक, डायरेक्ट इंजेक्शन, डिझेल इंजिन.
सिलींडर्सची संख्या 2
एअर क्लीनर ड्राय प्रकारचा, डस्ट अनलोडर असलेले ड्युअल एलिमेंट
कुलिंग सिस्टीम वॉटर कुलड्
श्रेणीकृत आरपीएम 1800 r/min
ट्रान्समिशन
प्रकार स्लाइडिंग मेश आणि अविरत मेशमधील रेंज गिऎअर्स
क्लच सिंगल क्लच (डायफ्रॅम प्रकारचा) मेकॅनिकल ऍक्च्य़ुएशन असलेला
गिअर्सची संख्या 6 फॉरवर्ड, 2 रिव्हर्स, 2 रिव्हर्स स्पीडस
गिअरचा वेग (किमी/तास), पुढच्या 5.00 x 15 आणि मागच्या 9.5 x 24 सह प्रकार
फॉरवर्ड 2.2 ते 23.3 km/h
रिव्हर्स 2.2 & 8.7km/h
पीटीओ
पीटीओ आरपीएम @ इंजिन आरपीएम 540 @ 1800r/min
ब्रेकस्रस
ब्रेकचा प्रकार ऑइल इमर्सड् ब्रेक्स
स्टिअरिंग
स्टिअरिंगचा प्रकार होयड्रोस्टॅटिक पॉवर स्टिअरिंग
हायड्रॉलिकस्
हायड्रॉलिक्स *लाइव्हर हायड्रॉलिक्स
A) स्थिती नियंत्रण:खालचे दुवे कोणत्याही वांछित उंचीवर धरून ठेवण्यासाठी.
B) स्वयंचलित ड्राफ्ट नियंत्रण:एकसमान ड्राफ्ट राखण्यासाठी
उचलण्याची क्षमता 1000 किग्राएफ खालच्या दुव्यांच्या टोकांशी.
लिंकेज 3 पॉइंट लिंकेज प्रवर्ग-1 प्रवर्ग 2 प्रकारच्या औजारांच्या पीन्ससाठी सोयीस्कर
टायर्स
पुढचे टायर्स 5.00 x 15
मागचे टायर्स 9.5 x 24
इलेक्ट्रिकल्स
इलेक्ट्रिकल्स 12 व्होल्ट, 75 एएच बॅटरी, स्टार्टर मोटर आणि अल्टरनेटर
वजने आणि आकारामाने
ओ.ए. लांबी x रुंदी x उंची 2900 मिमी x 1092 मिमी x 1340 मिमी स्टिअरिंग व्हीलवर
व्हील बेस 1550 मिमी
किमान ग्राउंड क्लिअरन्स 220 मिमी
ट्रॅक्टरचे वजन 1440 kg
इंधनाच्या टाकीची क्षमता लीटर्स 25
व्हील ट्रॅक पुढचा 970 मिमी
मागचा 840 मिमी

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.