महिंद्र फार्म इक्विपमेंट सेक्टरमध्ये आम्ही भारतीय शेतकऱ्यांसाठी मजुरांच्या तुटवड्याच्या समस्येला तोंड देणे, कार्यक्षमता वाढविणे, शेतीच्या कामाचा खर्च कमी करणे, आणि पिकाचे उत्पादन वाढविणे याबाबतीत मदत करण्यासाठी विविध प्रकारची प्रगतीशील कृषि यंत्रसामग्री पुरविण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या जागतिक दर्जाच्या संशोधन व विकास केन्द्रात आणि उत्पादन सुविधेत कृषि उत्पादनांचे डिझाईन, विकास आणि उत्पादन करतो. आपल्या शेतकर्यांसाठी अत्याधुनिक कृषि तंत्रज्ञान आणण्यासाठी आम्ही भारतातील आणि परदेशातील सर्वोत्कृष्ठ सहकार्यांबरोबर सहयोग करतो. आम्ही बटाट्याची लागवड, गाठड्या बांधणे, फवारणी करणे भाताची लावणी करणे यासाठी यंत्रसामग्री सादर करण्यासाठी युरोपमधील डेवुल्फ, टर्कीमधील हिसार्लर, भारतातील मित्र आणि जपानमधील मित्सुबिशी अॅग्रिकल्चरल मशिनरी यांचे बरोबर सहकार्य करार केले आहेत.
आमच्यापाशी विविध प्रकारच्या पिकांसाठी आणि शेताच्या आकारमानानुसार जमिनीच्या मशागतीपासून ते कापणीपश्चात अशा विविध कामांना योग्य असलेली अनेक प्रकारची ट्रॅक्टर अवजारे आणि स्वयंचलित कृषि यंत्रसामग्री आहे. काम करताना शेतकर्याला सर्वाधिक सुलभता आणि सर्वोत्कृष्टता यांचा लाभ व्हावा ह्या दृष्टीकोनातून ह्या उत्पादनांचे डिझाईन करण्यात आले आहे.
महिंद्राच्या अवजारे आणि स्वयंचलित कृषि यंत्रसामग्रीसाठी चॅनल पार्टनर्सचे विस्तारित नेटवर्क असल्यामुळे शेतीच्या हंगामाच्या काळात सुटे भाग सहज उपलब्ध होतात आणि उत्तम प्रशिक्षण घेतलेले, परिपूर्ण सुविधांनी सुसज्ज, व उत्तम प्रतिसाद देणार्या सेवा संघाच्या सहाय्याने वेळेवर सेवा उपलब्ध करून दिली जाते.
आम्ही संपूर्ण देशातील चॅनल पार्टनर्सच्या विस्तृत नेटवर्कच्या सहाय्याने ट्रॅक्टरची अवजारे आणि स्वयंचलित कृषि यंत्रसामग्री यांची विक्री करतो आणि विक्रीपश्चात सेवा पुरवितो. आमच्या डीलर्सच्या नेटवर्कसंबंधी माहितीसाठी आमच्याशी संफ साधा.
आम्ही अग्रणी वित्त पुरवठा करणार्या संस्थांसोबत सहकार्य करार केला असून ट्रॅक्टरची अवजारे आणि स्वयंचलित कृषि यंत्रसामग्रीसाठी ८०% पर्यंत स्वतंत्र वित्त पुरवठा केला जातो. अधिक माहितीसाठी, तुमच्या जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या डीलरशी किंवा आमच्याशी संपर्क साधा.