महिंद्रा जीवो 225 DI 4WD NT
कॉम्पॅक्ट डिझाइनसह शक्तिशाली ट्रॅक्टर्सचा विचार केल्यास, MAHINDRA JIVO 225 DI शुगरकेन स्पेशल 4WD ट्रॅक्टर श्रेणीमध्ये उच्च स्थानावर आहे. हा 14.9 kW (20 HP) इंजिन असलेला महिंद्रा 4WD ट्रॅक्टर श्रेणी मध्ये प्रथमच अशी शक्ती आणि नियंत्रण सुनिश्चित करतो. 2300 रेटेड RPM (r/min), 8 F + 4 R गीअर्स, दोन सिलिंडर आणि 750 kg हायड्रॉलिक लिफ्टिंग क्षमतेसह, हा नवीनतम ट्रॅक्टर काम सहज होण्याची खात्री देतो. इतर DI इंजिन ट्रॅक्टर प्रमाणेच, महिंद्रा मिनी ट्रॅक्टर देखील जड भार खेचण्याच्या आणि कमी वेळेत जास्त अंतर कापण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. महिंद्रा 4x4 ट्रॅक्टरची रचना दणकट (टफ) आहे, ज्यामुळे हा पावसाळ्या मध्ये ही काम करण्यास अगदी योग्य आहे. अधिक आरामदायक रचना आणि नियंत्रणासह, तुम्ही हा छोटा ट्रॅक्टर ऊसाच्या सरीं मधील चिखलात चालवू शकता आणि कोणत्याही अडचणीशिवाय काम पूर्ण करू शकता. MAHINDRA JIVO 225 DI 4WD शुगरकेन स्पेशल ट्रॅक्टर उत्कृष्ट रचने सह तयार केलेला आहे जो तुम्हाला अनेक कृषी उपक्रमांसाठी मदत करतो. हा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर उच्च इंधन कार्यक्षमता, कमी ट्रॅक रुंदी, ड्राफ्ट नियंत्रण, उत्कृष्ट जमीन तयार करणे आणि आरामदायी बसण्याची सुविधा देखील देतो. या महिंद्रा जीवो ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही ऊस आणि कपाशीची प्रभावीपणे लागवड आणि मशागत करू शकता आणि अरुंद ट्रॅक आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या फळबागेमध्ये काम करू शकता.