महिन्द्रा समूह

The Mahindra Group

एक स्टील ट्रेडिंग कंपनी म्हणून १९४५ मध्ये महिंद्रा स्थापन झाले. आम्ही १९४७ मध्ये विलीज् जीप भारतीय रस्त्यंवर आणण्यासाठी ऑटोमोटिव मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षात, आमच्या ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक नवीन व्यवसायात शिरकाव केला आहे. आम्ही उत्तम उद्यमविषयक स्वातंत्र्य आणि समूहांच्या एकत्रित उर्जेचा लाभ घेणाऱ्या सक्षम कंपन्या निर्माण करण्याच्या एका अद्वितीय नमुन्याचे अनुसरण करतो. ह्या तत्त्वाने आमच्या संपूर्ण जगातील १८० पेक्षा अधिक देशांत १८०,००० हून जास्त कर्मचारी असलेल्या यूएस $ 19 बिलीयन बहुराष्ट्रीय समूहापर्यंत वृद्धीत पुढारपण निभावले आहे.

आज आमचे कामकाज १८ महत्त्वाच्या उद्योगांत विस्तारले आहे जे प्रत्येक आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया असतात: एरोस्पेस, आफ्टरमार्केट, ऍग्रीबिझनेस, ऑटोमोटिव, कम्पोनन्टस्, बांधकाम उपकरणे, संमंत्रक सेवा, संरक्षण, उर्जा, शेतीची औजारे, वित्त आणि विमा, औद्योगिक साधने, माहिती तंत्रत्ज्ञान, आराम आणि पाहुणचार, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, रिटेल, आणि टु व्हीलर्स.

आमची संयुक्त रचना प्रत्येक व्यवसायाला स्वतःच्या भविष्याचा मार्ग आखण्यास आणि त्याचवेळी संपूर्ण समूहातील कार्यक्षमतांच्या एकत्रित उर्जेचा लाभ घेण्यास सक्षम करते. अशा पद्धतीने, आमच्या पारंगततेतील विविधता आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत विशिष्टक्षेत्रातील उत्तम ते आणण्यास सहाय्यक ठरते.

आज आमचे कामकाज १८ महत्त्वाच्या उद्योगांत विस्तारले आहे, जे प्रत्येक आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया असतातः

 • एरोस्पेस
 • आफ्टरमार्केट
 • ऍग्रीबिझनेस
 • ऑटोमोटिव
 • कम्पोनन्टस्
 • बांधकाम उपकरणे
 • संमंत्रक सेवा
 • संरक्षण
 • उर्जा
 • शेतीची औजारे
 • वित्त आणि विमा
 • औद्योगिक साधने
 • माहिती तंत्रज्ञान
 • आराम आणि पाहुणचार
 • लॉजिस्टिक्स
 • रिअल इस्टेट
 • रिटेल
 • टु व्हीलर्स

महिन्द्रा समूहाची वेबसाइटः : www.mahindra.com