प्रेरणा हा भारतीय महिलांना शेतीत पाठबळ देण्याचे आणि सक्षम करण्याचे उद्दिष्ट असलेला उपक्रम आहे. प्रेरणा हा बहुतेक वेळा महिला शेतीच्या अदृष्य चेहरा असतात या अंतर्द्रुष्टीवर आधारित आहे. भारतात १०० दशलक्ष महिला शेतीत आहेत, ज्यांच्यापैकी अनेक शेतातील कष्टाचे आणि पाठमोडीचे काम, बहुतेक वेळा महिलांसाठी सोयीस्कर नसलेल्या साधनांसह आणि उपकरणांनी अनेक तास करत असतात. या आव्हानांच्या उपरांतही त्यांना पुरुषांपेक्षा कमी मोबदला दिला जातो.

प्रेरणाच्या अधीन पहिला प्रकल्पआहे, महिन्दार अँड महिन्द्रा, सेंट्रल इंस्टिट्यूशन फॉर वुमेन इन ऍग्रीकल्चर (सीआयडब्ल्यूए), भारक सरकारच्या इंडियन कौंसिल फऑर ऍग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर)चा एक विबाग आणि एनजीओ -प्रदान (प्रोफेशनल असिस्टन्स फॉर डेवलपमेंट ऍक्शन) यांच्या दरम्यान सहकार्य, ज्याच उद्दिष्ट महिला मित्र, कार्यक्षम आणि कार्याभ्यास विषयक शेतीची औजारे आणि उपकरणे यांचासुनियोजित लक्ष्यित हस्तक्षेपामार्फत प्रसार करून समस्यांना संबोधित करणे. शेतकरी महिलांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, ज्याच्या परिणामी, शेती क्षेत्रात एक शाश्वत विकास घडून येईल. ३० पेक्षा जास्त गावांतील १५०० पेक्षा जास्त कुटुंबांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याच् उद्देशाने प्रकल्प प्रारंभी ओडिशा राज्यात सुरू केला जाईल.

हा प्रकल्प सुरू करण्याव्यतिरिक्त, महिन्द्राने शेतीतील महिलांचे जीवन सुधारण्यासाठी मार्गांवर सर्वसामान्य जनतेकडून योगदान संकलित करण्याचे उद्दिष्ट असलेल्ली एक स्पर्धासुद्धा सुरू केली आहे. स्पर्धेच्या विजेत्याला शेतीच्या क्षेत्रात कल्पकता आणि योगदानाचे गौरव करणाऱा एक वार्षिक समारंभ असलेल्या प्रतिष्ठीत महिन्द्रा समृद्धी पुरस्कारांसाठी एक विशेषाधिकार निमंत्रण दिले जाईल. स्पर्धा पृष्ठाशी जोडून घेण्यासाठी www.prerna-bymahindra.com हा दुवा आहे.

मजकूर प्रेरणाची दूरदृष्टी – स्त्रियांना वर येण्यासाठी सक्षम करून, भरभराट त्यांच्या पर्यंत पोचती करून स्त्री शेतकऱ्यांच्या आयुष्यात परावर्तन करत आहोत

शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ज्ञानाची उभारणी आणि क्षमता

लिंग तटस्थ शेती साधने सुरू करून शेतीतील कष्ट कमा करणे

उत्पन्नाचा प्रवाह निर्माण करणे आणि त्यांना स्वतंत्र करणे

त्यांची सामाजिक स्थिती आणि आदर सुधारणे

कार्यक्षम आणि कष्टाधारित शेतीची साधने आणि औजारांमार्फत महिलांना शेतीमध्ये सक्षम करणे

100 मिलीयन महिला शेतकरी आहेत ज्यांच्यापैकीबहुतेक जणी, बऱ्याच वेळा महिलांनी काम करण्यास सोयीस्कर नसलेल्या साधनांनी शेतातील कंटाळवाण्या आणि पाठीचा केणा मोडणाऱ्या कार्यांमध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या आहेत. ऑक्टोबर 2007 पासून प्रेरणा लाम्प्मटापुट, कोरापुट जिल्ह्यातील आणि जोशीपूर, मयुरभंज जिल्ह्यातील 40+ गावांत आणि लिंगतटस्थ, कार्यक्षम आणि कष्टाधारित उपकरणांच्या प्रसाराने चांदल्या तयार केलेल्या लक्ष्यित हस्तक्षेपाद्वारे 2000 महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करत आहे

या पवित्र कार्यात आमचे भागीदार आहेत भारत सरकारच्या इंडियन कौंसिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर) चा एक विबाग सेंट्रल इंस्टीट्यूशन फऑर विमेन इन ऍग्रीकल्चर (सीआयडब्ल्यूए) आणि एनजीओ प्रदान (प्रोफेशनल अँसिस्टन्स फॉर डेवलपमेंट ऍक्शन).

पीक उत्पादकता वाढवण्यासाठी महिला शेतकऱ्यांसोबत सबलीकरण मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवून उदरनिर्वाहाची निर्मिती करणे

नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला 'प्रेरणा' पुढाकार मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटका या तीन राज्यांच्या 60 गावांमध्ये सुरू करण्यात आला आणि शेतीमधील परिवर्तनकारी म्हणून 6000 पेक्षा जास्त महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचणे आण 600 चँपियन महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रारंभिक प्रकल्पामार्फत महिला शेतकऱ्यांबरोबर सुधारित शेतीच्या पद्धतींवर त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी, शेतीच्या यांत्रिकरणाची ओळख करून देण्यासाठी आणि इतर शेतकऱ्यासमवेत सहाध्यायी शिकण्याची सुविधा निर्माण करण्याचे प्रयास केले जातील. प्रकल्प बीएआयएफ इंस्टीट्यूट फॉर सस्टेनेबल लीवलीहूडस् अँड डेवलपमेंट बरोबर भागीदारीत राबवला जाईल.

व्हिडिओ गॅलरी

भागीदार

🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.