तंत्रज्ञान

दि महिन्द्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) म्हणजे महिन्द्रा समूहाच्या, तंत्रज्ञनाने प्रेरित कल्पकतेशी बांधीलकीचा पुरावा आहे. या सुविधा केंद्रात ऑटोमोबाइल्स आणि ट्रॅक्टर्ससाठी अभियांत्रिकी संशोधन आणि उत्पादन विकास शाखा एकाच छताखाली आहेत. अत्याधुनिक एमआरव्ही सुविधा केंद्राचे उद्घाटन भारताचे आदरणीय माजी राष्ट्रपती महनीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले.

संशोधन आणि विकास केंद्रात अनेक सुविदा आहेत ज्यातील काही आहेत जागतिक दर्जाचे इंजिन डेवलपमेंट सेंटर (इडीसी), एनव्हीएच लॅब, फॅटिग टेस्ट लॅब, पर्यायी इंधने, प्रवासी सुरक्षा आणि पॉलीमर टेक्नॉलॉजी लॅब. एमआरव्हीमध्ये नवीन उत्पादने आणि नवीन तंत्रज्ञानाला पाठबळ पुरविण्यासाठी सुसज्ज प्रोटो शॉप्स आहेत आणि तिथे वाहने आणि ट्रॅक्टर्सची विश्वासार्हता तपासण्यासाठी चाचणी मार्गिका आहेत.