भुईमुगाच्या शेतीसाठी सुयोग्य ट्रॅक्टर निवडणे

Mar 22, 2023 |

ग्राउंडनट किंवा भुईमूग भारतातल्या पाच राज्यांमध्ये घेतला जातो, ती म्हणजे: आंध्रप्रदेश, गुजराथ, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्र. प्रदेशांच्या वैविध्याचा, पिक घेतले जाणा-या मृदेचा विचार करुन , एकाच पिकासाठी असलेल्या बारीकसारीक प्रक्रिया प्रत्येक प्रदेशामध्ये केल्या जातात. या लहानमोठ्या प्रक्रियांमध्ये अनेक कृषी उपकरणांची, खतांची आणि पिकावर वेळेवर उपचार करण्याची आवश्यकता भासते. सर्व ट्रॅक्टर्स या सर्व कामांना सहजपणे हाताळू शकत नाहीत. तुम्हाला असा ट्रॅक्टर निवडावा लागतो, जो भुईमूगाच्या शेतीसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट करण्यास सक्षम असेल. या लेखामध्ये आपण भुईमूगाच्या शेतीसाठी आदर्श असलेल्या भारतीय ट्रॅक्टरची निवड करण्यावर चर्चा करत आहोत.

योग्य ट्रॅक्टर निवडणे का महत्वाचे असते

भुईमूगासाठीचा ट्रॅक्टर अनेक शेतकी कामे शक्य आणि सहज करतो, पण केवळ याच कारणामुळे तुम्हाला योग्य ट्रॅक्टर निवडण्याची आवश्यकता नसते.

भुईमूगाच्या शेतीसाठी अवजड शेतकी उपकरणे उदा. रोटॅव्हेटर आणि प्लांटर लागतात. ही उपकरणे उच्च-पाव्हर असलेल्या इंजिनने आणि लक्षणीय पीटीओ (PTO )पाव्हरने चालतात. आदर्श ट्रॅक्टर तुम्हाला अवजड उपकरणे वापरण्यात मदत करतो, सोबत पिकाच्या इष्टतम वाढीसाठी मातीच्या स्थिती राखतो.

प्रिसिजन हायड्रॉलिक्स पेरणी आणि खणण्याच्या कामासाठी भुईमूगाच्या शेतीमध्ये अतिशय महत्वाची असतात. महिंद्रा त्याच्या XP प्लस आणि युवो रेंजसह प्रिसिजन हायड्रॉलिक्स देते, ज्यामुळे ते भुईमूगाच्या शेतीसाठी अतिशय सुयोग्य ठरतात. ट्रॅक्टरसाठी पुरेश्याप्रमाणात बॅकअप टॉर्कची आणि योग्य प्रकारच्या ॲक्सेलची आणि कृषी अवजारे आणि उपकरणे वाहण्यासाठी शेतीच्या प्रदेशाला नॅव्हिगेट करण्यासाठी व्हील्सची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त, भुईमूगाच्या शेतीसाठी तुमच्या ट्रॅक्टरने घाम न गाळता, विश्वासार्हतेने आणि इंधन सक्षमतेने या गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे.

एकंदरीत भुईमूगाच्या शेतीसाठी असलेल्या योग्य ट्रॅक्टरमुळे तुमची शेती कार्ये सुरळीतपणे चालतात, ज्यामुळे तुमचे कष्ट, वेळ आणि उत्पादनाचा खर्च वाचतो. परिणामत: अधिक चांगल्या पिकाची खात्री मिळते.

भुईमूग शेतीसाठी महिंद्रा ट्रॅक्टर

बाजारपेठेमध्ये जरी शेकडो ट्रॅक्टर असले, तरी बहुतांश भुईमूग शेतीच्या शेतकी आव्हानांना हाताळू शकत नाहीत. सुदैवाने, महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि शेती उपकरणे हे काम करु शकतात. इतर ट्रॅक्टरपेक्षा वेगळे असलेले आमचे भुईमूग शेती ट्रॅक्टर उच्च पीटीओ(PTO) पाव्हर, शक्तीशाली इंजिन, प्रिसिजन हायड्रॉलिक्स, विश्वासार्हता आणि कणखरपणा देतात. भुईमूगाच्या शेतीसाठी दोन सर्वोत्तम ट्रॅक्टर्स आहेत.

Connect With Us

तुम्हालाही आवडेल