3 दशकांपेक्षा जास्त काळासाठी, महिन्द्रा निर्विवादपणे भारताचा क्र. 1 चा ब्रँड आणि संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर्सचा निर्माता आहे. $19.4 बिलीयन महिन्द्रा समूहाचा भाग असलेली महिन्द्रा ट्रॅक्टर्स ही महिन्द्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (एपइपी) चे ध्वजनौका (फ्लॅगशिप) युनीट असलेल्या फार्म डिव्हीजनचा अविभाज्य भाग आहे.
40 पेक्षा जास्त देशांत अस्तित्व असलेल्या डेमिंग पारितोषिक आणि जापनीज् क्वालिटी मेडल अशी दोन्ही पारितो,क प्राप्त करणाऱ्या जगातील एकमेव ब्रँड महिन्द्राने त्याच्या दर्जावर जोर दिला आहे. महिन्द्रापाशी ट्रॅक्टर्सच्या सर्वात सर्वसमावेशक श्रेणींमधील ट्रॅक्टर्स आहेत आणि तो भारताच्या ट्रॅक्टर उद्योगाशी समानार्थी आहे. मार्च 2019 मध्ये 3 मिलीयन ट्रॅक्टर बाहेर काढणारा महिन्द्रा भारताचा पहिला ब्रँड ठरला आहे
शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्याबरोबर काम केलेले, महिन्द्रा ट्रॅक्टर्स आज त्यांच्या अपवादात्मक बांधणीसाठी आणि खडबडीत आणि कशालाही दाद न दजेणाऱ्या भूप्रदेशावरील कामगिरीसाठी जाणले जातात. महिन्द्रा 'टफ हरदम´- कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार, म्हटले जाते यात काहीच आश्चर्य नाही. पृथ्वीवरच्या सर्वात कणखर, सर्वात अवलंबनीय ट्रक्टर्ससह शेतकऱ्यांबरोबरच्या आपल्या मजबूत संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी महिन्द्रा ट्रॅक्टर्स उपक्रमांची मालिका सुरू ठेवेल.